देशवासियांमध्ये राष्ट्राभिमान जोपासणे, तो सतत जागृत ठेवणे आणि तो वृद्धींगत करणे, हे राष्ट्ररक्षणाचे कार्य करू इच्छिणार्या प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्राभिमान जोपासण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांचे वैचारिक प्रबोधन करणे ! स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांमध्ये वैचारिक प्रबोधन करणारा प.पू. गुरूदेवांचा हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
पूर्वीची नीतिमत्ता विसरलेले हिंदू ! `कर्नल एतार्ह्सी छातीला हात लावून सांगतो, ``हिंदु हा कधीच अब्रू, संपत्ती अथवा प्राणरक्षणाकरिताही खोटे बोलायचा नाही !'' गेल्या शतकाच्या पूर्वार्धातील ही स्थिती आहे. इ.स. १९४३ चा बंगालचा ऐतिहासिक दुष्काळ ! सहस्रश: लोक भुकेने तडफडून कलकत्त्याच्या फुटपाथावर मरून पडले. गोदामातील व अन्य ठिकाणचे धान्य लुटणे शक्य असूनही, त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. समोरच्या दुकानांत धान्य होते. त्यांना दिसत होते; पण त्यांनी ते लुटले नाही कि दरोडे घातले नाहीत. महाराष्ट्रातील `दुर्गादेवी दुष्काळ !' या भयंकर दुष्काळातही लक्षावधी लोक मेले; पण कुणी लुटमार केली नाही. त्यांनी `धर्महानी' पत्करली नाही. धर्महानीला त्यांनी रतिमात्र वाव दिला नाही ! `कामनेने, भयाने, लोभाने नव्हे, तर प्राण गेला तरीदेखील धर्म सोडू नका !' (`न जातु कामान् न भयान् न लोभात् । धर्मं त्यजेत् जिवितस्यापि हेतो: ।') हे व्यासांचे धर्मसूत्र त्यांनी प्राणपणाने सांभाळले.
प्रत्येक हिंदूच्या अंतर्यामी अशा प्रकारची श्रद्धा आहे की, आपल्या कर्र्मौंामाणे आपल्याला सुख-दु:ख प्राप्त होते. आपल्या कर्माची फळे या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतात. कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीपासून सहस्रश: वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यंत ही कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा कायम होती. स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली व आज ती जवळजवळ नष्ट झाली. नंतरच्या ५०-६० वर्षांत हिंदूंना त्याच्या सनातन धर्मापासून कोणी दूर केले ?'
१. हिंदू नीतीमत्ता विसरण्याचे कारण म्हणजे भोगलालसा `आज क्षुद्र मोहाला बळी पडून हिंदु धर्मत्याग करू शकतो ? हे मोह कोणते ? याचा विचार केला, तर ते म्हणजे कृत्रिम भोगसाधने !
धर्मावरील श्रद्धा नष्ट झाल्यामुळे हिंदु समाज छिन्न-भिन्न झाला. तो ऐषारामी जीवनाकडे ओढला गेला. त्याकरिता भ्रष्टाचार ! आश्चर्याची बाब अशी, ज्या अमेरिकन लोकांना पुनर्जन्म व कर्मफल अमान्य आहे, तेदेखील सर्व प्रकारची मोहाची साधने आणि संधी उपलब्ध असतांनादेखील आजच्या सेक्युलर समाजापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात कमी भ्रष्टाचारी आहेत. भारतापेक्षा अमेरिकेत भ्रष्टाचार कमी असल्याचे आकडेवारी सिद्ध करते. केवढा चमत्कार!
जो हिंदु समाज धार्मिक आणि नीतीमान होता, तोच आज ऐषारामी जीवनाला चटावला आहे. आर्थिक साम्राज्य प्रस्थापित करू पहाणार्या कंपन्यांच्या आकर्षक जाहिरातींमुळे तो या ऐषारामी भोगसाधनांना बळी पडतो ! हप्त्याहप्त्याने सगळी भोगसाधने पुरवणार्या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडतो ! दिवसेंदिवस त्याची ऐषारामाची तहान वाढतेच आहे. अधिकाधिक भोगसाधने जवळ बाळगण्यात त्याला आनंद वाटतो. त्याच्या इच्छा वाढतात आणि तो कर्जाच्या जाळयात फसतो. अखेरीला भ्रष्टाचारी बनतो. हेच काही अध:पतनाचे एकमेव कारण नाही ! प्रश्न असा की, लक्षावधी वर्षांपासूनची आमची धर्मश्रद्धा; ज्या श्रद्धेने हिंदु समाजाचे रक्षण केले ती श्रद्धा, या पन्नास-साठ वर्षांच्या काळामध्ये नष्ट कशी झाली, याचा विचार केला का ?'
२. हिंदु शिक्षणप्रणाली बंद करून इंग्रजी शिक्षण सुरू करणारे धर्मद्रोही राजा राममोहन रॉय ! `राजा राममोहन यांना हिंदु धर्म भ्रष्ट व विकृत करण्याकरिता इंग्रजांकडून करोडो रुपये मिळाले. त्यांचे वडील वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची आई कृष्णभक्त आणि तेजस्वी पतिव्रता होती. दुपारी चार वाजेपर्यंत ती पोटात अन्नाचा कणही टाकत नसे. त्यांना तीन मुले होती. राममोहन थोरले होते. ते वडिलांकडून संस्कृत व धर्मशास्त्र शिकले. पुढच्या अध्ययनाकरिता काशीला गेले. तिथे पंडित झाले.
ते कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे संस्कृतबरोबर इंग्रजी व पर्शियन शिकले. हुशार असल्यामुळे ब्रिटीश गव्हर्नरपर्यंत त्यांचे जाणे येणे सुरू झाले.
त्या वेळेस ब्रिटीश शासनाने वेदपाठशाळा व संस्कृत यांच्या अध्ययनाकरिता बरीच मोठी रक्कम मंजूर केली होती. त्यानुसार हिंदूंची षड्दर्शने, वेदविद्या आणि संस्कृत वाड्मय शिकवण्याची सोय होणार होती. राममोहन यांनी गव्हर्नरला पुढील पत्र लिहिले - `...या वेदपाठशाळा, संस्कृत, हे सगळं बंद करा. हा सगळा पैसा तुमची पाश्चात्त्य शास्त्रे हिंदूंना शिकवण्याकरिता खर्च करा. युरोपातले प्राध्यापक आणा. ते आम्हाला विज्ञान, गणित वगैरे विषय शिकवतील. संस्कृत, वेदांत, न्यायशास्त्र ही पोपटपंची बंद करा !' ब्रिटीश शासन खुश झाले.
हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याची त्यांचीच योजना राममोहन यांनी उचलून धरली होती. राममोहन यांना हाताशी धरून ब्रिटिशांनी संस्कृतऐवजी इंग्रजी शिक्षण द्यायला प्रारंभ केले. त्या दुर्दैवी दिवसापासून हिंदूंच्या अध:पतनाला प्रारंभ झाला.'
३. इंग्रजी शिक्षणाचे दुष्परिणाम `संस्कृत ही `देवभाषा', तर इंग्रजी ही `व्यापारीभाषा' आहे. इंग्रजी शिक्षण द्यायला प्रारंभ झाला त्या दिवसापासून आम्ही आत्मविस्मृतीच्या गहन अंधारात फेकले गेलो. संस्कृतची उपेक्षा आणि संस्कृतीविषयी तुच्छता निर्माण झाली. संस्कृतचे हिंदु पंडित आणि विद्यार्थी यांच्याकडे समाज तुच्छ दृष्टीने पाहू लागला. इंग्रजी, रसायनशास्त्र, विज्ञान, तंत्र यांचे शिक्षण घेणार्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली. त्यांना नोकर्या मिळू लागल्या. त्याचा परिणाम असा झाला की, हिंदु समाजातला बुद्धीमान वर्ग संस्कृतपासून दूर गेला. संस्कृत पंडित हळूहळू युरोपियन प्रोफेसरांच्या रांगेत बसू लागले. हे हिंदू प्रोफेसर हिंदूंच्या सगळया अस्मिता तुच्छ करण्यात अभिमान बाळगू
लागले. `हिंदु समाजाने संस्कृत आणि प्राचीन शास्त्र यांसारख्या कालबाह्य गोष्टींपासून दूर रहावे', असे सांगू लागले.
त्यात त्यांना अभिमान वाटू लागला. (राजीव गांधी पंतप्रधान असतांना, त्यांनी भारतातून तर संस्कृतचे समूळ उच्चाटन केलेच; परंतु परदेशात कुठेही संस्कृत शिकविले जाऊ नये, म्हणून सर्वदूर प्रतिनिधी मंडळे पाठवली.)'
४. इंग्रजी शिक्षणाने पोसलेला बुद्धीवाद म्हणजेच इहवाद व ख्रिस्तीधर्म हिंदूंच्या श्रद्धा निर्मूलन करण्याकरिताच या इंग्रजाळलेल्या हिंदू पंडितांनी चळवळी उभारल्या. या पृथ्वीवर सर्वाधिक श्रेष्ठ अशी ` ख्रिस्तीसंस्कृती' आणि ख्रिस्तीधर्म' आहे, असे चित्र ते रंगवू लागले. ``म्हणजे त्यांनी बुद्धीवाद पोसला!'', प्रा. मेहेर म्हणाले. गुरुदेव म्हणाले, ``बुद्धीवाद म्हणजेच इहवाद! तिथे फक्त `अर्थ' आणि `काम' हे दोनच पुरुषार्थ उरले. येथे कर्मफल व पुनर्जन्म यांची `शास्त्र-श्रद्धा' केव्हाच धुळीला मिळाली आहे. बुद्धीच्या (इंद्रियांच्या) कक्षेत जे येत नाही ते ते नाकारले गेले आहे.
म्हणजे हिंदूंच्या विधिनिषेधांना त्यांनी अंधश्रद्धा ठरवले ! या श्रद्धा घातक असल्याचे प्रतिपादले आणि हिंदु समाजाला अध:पाताकडे खेचले. इहवाद म्हणजे विज्ञाननिष्ठ बुद्धीवाद सांगून इंद्रियगम्य, बुद्धीगम्य असे निष्कर्ष काढून हिदूंची समाजरचना, ती मूलभूत तत्त्वे, दर्शनशास्त्रे, तत्त्वज्ञान जे आमच्या पूर्वज ऋषींना प्राप्त झाले होते, तो केवळ मूर्खपणा असल्याचे त्यांनी घोषित केले. वेद-वाड्मय ही रानटी लोकांची काव्ये आहेत, लोकगीते आहेत, असे निष्कर्ष त्यांनी काढले. अपौरुषेय, अनादी वेदवाड्मयाला, श्रुति-स्मृति-पुराणांना भाकड ठरविणारी शतश:
नव्हे, तर सहस्रश: पुस्तके त्यांनी लिहिली.'' ``पण हे हिंदू विद्यार्थी व पंडित यांनी मान्य तरी कसे केले ?'' डॉ. मेहेर म्हणाले.
गुरुदेव पुढे सांगू लागले, ``मॅकोलेची शिक्षणपद्धती अमलात आली होती. युरोपियन प्रोफेसरांनी त्यांची संस्कृती शिक्षणातून रुजविली. त्या संस्कृतीला प्रतिष्ठा आणि पैसा प्राप्त होत होता. इंग्रजी विद्येचा सन्मान होत होता!...''
५. हिंदु धर्म संस्कृतीला तुच्छ लेखणारे इंग्रजाळलेले पंडित !`गुरुदेव पुढे गंभीरवाणीने सांगू लागले, ``आप्तवाक्य हा टवाळीचा विषय झाला. हे विष इंग्रजी शिकलेल्या हिंदूंच्या रक्तात भिनले आणि ते उत्तरोत्तर असे चढत गेले की त्यांना आपला धर्म आणि पूर्वज यांची लाज वाटू लागली. युरोपियन लोकांची थुंकी झेलण्यात ते अहमहमिकेने पुढे सरसावलेत. काहींनी हिंदु धर्म पूर्णपणे नाकारला ! थोडे विज्ञान विषयाचे समर्थन करू लागले. काहींनी धर्मात सुधारणा करण्याची अभिलाषा बाळगली. आणखी एक गंमत आहे. हे जे हिंदु धर्म संस्कृतीला तुच्छ लेखणारे इंग्रजाळलेले संस्कृत पंडित होते, त्यांना समाजात मान होता आणि ते श्रीमंत घराण्यातले होते, उदा. बंगालचे राममोहन, ईश्वरचंद्र विद्यासागर. महाराष्ट्रातही असे इंग्रजाळलेले पंडित होतेच. लोकहितवादी, भांडारकर, न्यायमूर्ती म.गो. रानडे, चंदावरकर असे प्रार्थना समाजवाले व आगरकरांसारखे धर्मसुधारक वगैरे.'
६. म्हणे निवृत्तीकडे वळल्यामुळे हिंदुस्थानची दुर्दशा झाली ! `शंकरांनी वेदांतातला मायावाद शिकवून म्हणे, हिंदु समाजाला मुर्दाड केले ! लोक निवृत्तीमार्गी झाले, उदासीन झाले, म्हणून परक्यांना फावले. आज आमच्या देशावर दुर्भाग्य कोसळले आहे ते का ? त्याची ही का कारणमीमांसा आहे ? हे इंग्रजी छायेचे लोक तसेच सांगतात. निवृत्तीकडे वळल्यामुळे हिंदुस्थानची अशी दुर्दशा झाली, असे कुणीच दाखवू शकत नाही ! तसा अभावानेही पुरावा नाही.'
७. गोर्यांचे पाय लागण्याआधीचा भारताचा ऐश्वर्यशाली इतिहास ! `अरे, हे गोरे पाय या भूमीला लागण्याआधी या भारताची सर्व प्रकारे भरभराट होत होती. भारत ऐश्वर्यवान होता. मग या इंग्रजांची घटोत्कची माया अवतरली आणि हे अंधाराचे दिवस आले. या गोर्यांचे पाय लागण्याआधी आमचा ऐश्वर्यशाली इतिहास पहा !.. इथे संपत्ती ऐश्वर्य होते.
सोन्याचा धूर होता. विद्या होत्या, व्यापार होता. परक्यांनी मत्सर करावा अशी अमाप संपत्ती, शौर्य होते. पराक्रम होता. युद्धाचा प्रसंग आला, तर लोक रणांगणावर मरायला तत्पर असत. रणांगणावर जायला ते घाबरले, असे कधी झालेच नाही.'
आता हिंदूदेखील इतिहासजमा होणार !`गांधी-नेहरूंच्या या सेक्युलर, निधर्मीपणाच्या शासनप्रणालीत गोग्रास द्यायला गाय मिळणेही भाग्याचेच ठरणार आहे. आता वैदिक ब्राह्मणच काय; परंतु हिंदूदेखील इतिहास जमा व्हायचा बाका प्रसंग ओढावला आहे.'
(हिंदुस्थानची दुर्दशा का झाली ?, पृ. १०-११. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)
`स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वधर्मसमभावी समाजवादी लोकशाही शासन आले आणि हिंदूंची सर्व बाजूंनी, सर्व क्षेत्रांत गळचेपी होऊ लागली. समाजवादी लोकशाहीने हिंदूंना नवा इतिहास शिकवला. तो असा की, हिंदूंना भूतकाळ नाही, वर्तमानकाळ नाही आणि भविष्यकाळही नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदु समाजाचा सनातनधर्म आणि संस्कृती, त्यांचे रितीरिवाज, परंपरा, शाश्वत असे वर्णधर्म, जातिधर्म, कुलधर्म, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था या सर्वांवर बुलडोझर फिरवला गेला आहे. हिंदु-कोडबिल आणून महाभयंकर दुष्कृत्य केले गेले आहे.त्यांची गणना महापापातदेखील करता यायची नाही. हिंदूंचे वर्तमान आणि भविष्य यांनी छिन्न-भिन्न केले. त्यामुळे हिंदू संभ्रमावस्थेत आहे !, हिंदू कोण ? तेच आम्हाला कळेनासे झाले आहे. इंग्रजी शिक्षणात वाढलेल्या हिंदूंना `हिंदू' म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. हिंदु, जैन, शिख, बौद्ध, लिंगायत, पारशी असे वेगळे पंथ स्वीकारून त्यांच्याकरिता खास सवलती जाहीर केल्या. या लाकशाहीने मताच्या लाचारीकरिता पुरलेले मुडदे उकरून काढले. (हिंदू कोण ?, पृ. ४-५. प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ)